शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पहिल्‍याच दिवशी 'पॅडमॅन' ने केली १० कोटींची कमाई

पहिल्‍याच दिवशी 'पॅडमॅन'ने तब्‍बल १० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्‍विट करून याची माहिती दिली आहे. पॅडमॅन' प्रेक्षकांच्‍या नक्‍कीच पसंतीस उतरेल असे वाटते. चित्रपटाची कहाणी संवेदनशील आहे. महिलांच्‍या मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिनचा वापर किती महत्त्‍वाचा आहे, हे अतिशय संवेदनशीलपणे या चित्रपटात मांडण्‍यात आलं आहे. अक्षय कुमारच्‍या दमदार अभिनयाने या चित्रपटाला एका पातळीवर नेले आहे. आता २०१८ ला दुसर्‍या १०० कोटींच्‍या क्‍लबमध्‍ये हा चित्रपट सहभागी होणार की नाही, हे आता पाहावे लागणार आहे. 
 
रिअल पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनाथम यांच्‍या आयुष्‍यावर आधारित हा चित्रपट आहे. पॅडमॅन केवळ २० कोटींच्‍या बजेटवर तयार झाला आहे. यात अभिनेता अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर यांच्‍या भूमिका आहेत. पॅडमॅनची निर्मिती ट्‍विंकल खन्‍नाने केली आहे.