बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2018 (15:30 IST)

पॅडमॅनचे नवे गाणे, 'साले सपने' रिलीज

'पॅडमॅन' चित्रपटाचे नवे गाणे 'साले सपने' रिलीज झाले आहे. या गाण्‍यात बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार सॅनिटरी नॅपकिन मशीनवर तयार करताना दिसत आहे. गाण्‍याचा म्‍युझिक व्‍हिडिओ अक्षयने आपल्‍या ट्‍विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. अक्षयने हे गाणे सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे...

'सपने तब तक साकार नहीं होते जब तक आप इनके लिए काम न करें। यह गाना सपने देखने वालों के लिए है।'  हे गाणे मोहित चौहानने गायले आहे. तर संगीत अमित त्रिवेदी यांचे आहे. चित्रपटाची कथा आर. बाल्‍कीने लिहिली असून ट्विंकल खन्ना निर्मिती करत आहे. चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्‍या आयुष्‍यावर आधारित आहे. अरुणाचलम मुरुगनाथम हे खरे 'पॅडमॅन' आहेत. २५ जानेवारीला चित्रपट रिलीज होणार आहे.