बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पाकिस्तानामध्ये 'पॅडमॅन' बॅन, रशियामध्ये झाला प्रदर्शित

भारतामध्ये अक्षयकुमारचा 'पॅडमॅन' रीलिज झाला आहे. मात्र 'पॅडमॅन' बॅन झाला आहे. पॅडमॅन चित्रपटाचा विषय पाहता पाकिस्तानामध्ये या चित्रपटाला मंजुरी मिळालेली नाही.
 
'पॅडमॅन' चित्रपटाला पाकिस्तानामध्ये NOC मिळालेली नाही. IMGC च्या अमजद राशिदने या चित्रपटाला विकत घेतले होते. मात्र ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट इम्पोर्ट न करण्याचा सल्ला  दिला आहे. 'मासिकपाळी' या विषयावरून पाकिस्तानामध्ये परिस्थिती बिघडू शकते.परिणामी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे.अभिनेता अक्षयकुमार 'पॅडमॅन' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकला आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटेदेखील खास भूमिकेत आहे. 
 
दुसरीकडे हा चित्रपट रशिया, आयवरी कोस्ट, इराक या देशामध्ये चित्रपट रीलिज होणार आहे. भारत आणि रशियामध्ये एकाच दिवशी रिलिज होणारा 'पॅडमॅन' हा पाहिला चित्रपट आहे.