रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मुझे लडकी मिल गयी: सलमान

सलमान खानने पन्नाशी गाठल्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगी मिळाली आहे. कारण याचे उत्तर खुद्द सलमान खानने दिले आहे असे वाटत आहे कारण, मुझे लडकी मिल गयी.. सलमानने टि्वट केले आहे. त्याच्या या टि्वटमुळे चाहत्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. या टि्वटला ना आगा ना पिछा. त्यामुळे सल्लूमियाच्या फॅन्समध्ये तर्क रंगायला सुरुवात झाली आहे.
 
सलमान लुलियाला डेट करत असल्याचा चर्चा आहे. त्या खर्‍या मानल्या तरी भाईजान आपल्या लव्ह लाईफबद्दल अशी चर्चा करण्याची चिन्हं तशी कमीच. सलमान खानची बहीण अर्पिताचा पती आयुष लव्हरात्री चित्रपटातून पदार्पण करत आहे. या सिनेमाची निर्मिती सलमानने केली आहे. त्यामुळे या सिनेमाची हिरोईन मिळाल्याचीही शक्यता आहे.
 
विशेष म्हणजे काही जणांनी सलमानला ट्रोल करायलाही सुरुवात केली आहे. लडकी मिली है या आंटी? अगर आप थायलंड में हो तो चेक कर लेना, लडकी नही होगी, असे टि्वट काही जणांनी केले आहेत.