सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 फेब्रुवारी 2018 (08:58 IST)

'पॅडमॅन'च्‍या निर्मात्‍यांनी कथा चोरल्‍याचा आरोप, गुन्‍हा दाखल

अभिनेता अक्षय कुमार विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात असून त्‍याच्‍यावर पॅडमॅन  चित्रपटाची कथा चोरल्‍याचा आरोप आहे. लेखक रिपू दमन जायसवालने ही कथा आपण लिहिली असून 'पॅडमॅन'च्‍या निर्मात्‍यांनी ही कथा चोरल्‍याचा आरोप केला आहे.  

रिपूने आपल्‍या फेसबुक अकाउंटवर २० डिसेंबर २०१७ ला एक मोठी पोस्ट लिहिली होती. यात त्‍याने म्‍हटले होते....

'मी दीड वर्षांपूर्वी मी अरुणाचलम मुरुगनाथम आणि साती बायॉडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सवर कथा लिहिली होती. ती कथा मी ५ डिसेंबर २०१६ ला स्क्रीन रायटर असोसिएशनमध्‍ये रजिस्‍टर केली होती. आणि रेयान स्टीफन (करण जौहर प्रॉडक्शनचे क्रिएटिव्‍ह हेड) आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्‍याकडे पाठवली होती. १० दिवसांनंतर १६ डिसेंबर २०१६ ला मी ऐकलं की मिसेस ट्‍विंकल खन्‍ना यांनी घोषणा केली की त्‍यांचं प्रोडक्‍शन हाऊस अरुणाचलम मुरुगनाथमच्‍या आयुष्‍यावर अक्षय चित्रपट बनवणार आहेत. 

रिपूने पोस्टमध्‍ये पुढे म्‍हटले आहे, 'नुकताच 'पॅडमॅ'नचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्‍यातील बहुतांश सीन्‍स माझ्‍या कथेतून चोरले गेले आहेत. ही कथा मी रेयान स्टीफनना पाठवली होती. इतकेच नव्‍हे, माझ्‍या कथेतील काल्पनिक सीन (रक्षाबंधन सीन) देखील चोरण्‍यात आला आहे. खरं म्‍हणजे अरुणाचलमची बहिणच नाहीये. मी निर्णय घेतला आहे की, मी हे प्रकरण कोर्टात नेईन आणि चित्रपट निर्मात्‍यांविरोधात लढेन.'