रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मे 2018 (15:36 IST)

म्हणून बच्चन यांनी थिएटर मालकांना केली विनंती

महानायक अमिताभ बच्चन यांनी थिएटर मालकांना विनंती करुन, ‘102 नॉट आऊट’ या सिनेमासंदर्भात विनंती केली आहे. “अनेक प्रेक्षकांना ‘102 नॉट आऊट’ सिनेमाच्या शेवटी असलेलं गाणं ऐकता, पाहता येत नाही. त्यामुळे थिएटर मालकांनो, कृपया ते गाणं न कापता पूर्ण सिनेमा दाखवा.”, असे ट्वीट करुन अमिताभ बच्चन यांनी गाण्याची लिंकसुद्धा शेअर केली आहे. विशेष म्हणजे, या ट्वीटसोबत अमिताभ बच्चन यांनी हात जोडलेला फोटो अपलोड केला आहे.  

सिनेमाचा शो लवकर संपवण्यासाठी अनेक ठिकाणी थिएटर मालक ‘102 नॉट आऊट’ सिनेमाच्या शेवटी असलेलं गाणं कट करतात. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. त्यांची दखल घेत, अमिताभ बच्चन यांनी थिएटर मालकांना विनंती केली आहे.