सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 5 मे 2018 (13:47 IST)

Movie Review: 102 नॉट आउट

'102 नॉट आउट' ची कथा : ही कथा आहे दत्तात्रेय वखारिया (अमिताभ बच्चन) नावाच्या एका वृद्ध व्यक्तीची, जो चीनच्या एका 118 वर्षीय ओंग चोंग तुंगपेक्षा जास्त जिवंत राहण्याचा रेकॉर्ड बनवायची इच्छा बाळगून असतो. ओंगजवळ 118 वर्ष जिवंत राहण्याचा वर्ल्ड रिकॉर्ड आहे आणि दत्तात्रेय निश्चित करतो की हा रेकॉर्ड तो मोडेल. दत्तात्रेयाचा एक मुलगा आहे बाबूलाल (ऋषी कपूर) ज्याचे वय 75 वर्ष आहे. तो आपल्या वडिलांपासून बिलकुल विपरीत आहे. दत्तात्रेय नेहमी आनंदी राहतो, तो निगेटिव्हीटीला नेमही स्वत:पेक्षा दूर ठेवतो आणि याच्या विपरित बाबूलालच्या जीवनात कुठलाही आनंद नसतो. या दरम्यान एक दिवस दत्तात्रेय निश्चित करतो की जर त्याच्या मुलाने आपले लाइफस्टाइल नाही बदलले तर तो त्याला वृद्धाश्रमात पाठवेल. कथा या दोन्ही बाप आणि मुलाच्या अवती भवति फिरते. या दोघांमध्ये सामंजस्य बसवण्याचा प्रयत्न करतो धीरू (जिमित त्रिवेदी)।
 
हे चित्रपट एक गुजराती प्लेवर आधारित आहे, ज्यात सांगण्यात आले आहे की वय फक्त एक आहे. माणसाचे वय वाढत नाही बलकी तो आपल्या विचारांमुळे म्हातारा होतो. बाप आणि मुलामध्ये सतत मजेदार रस्साकशी होत राहते. सौम्य जोशी आमिर खान स्टारर 'पीके', '3 इडियट्स' आणि संजय दत्तची बायोपिक लिहिणारे अभिजात जोशीचे मोठे भाऊ आहे. कहाणी सेंसेटिव आणि मनाला लागणारी आहे. म्हातारपणाची भिती तुम्ही कशी दूर करू शकता हे सांगण्यात आले आहे.
 
निर्देशक शुक्ला यांनी चित्रपटासाठी मुंबईसिटीत एक आकर्षक घराचे सेट तयार केले होते. स्टोरी लाइनप्रमाणे चित्रपटाची लांबी 101 मिनिट आहे. डायलॉगास फनी आहे. कधी ही हसवते तर कधी डोळ्यातून अश्रू देखील आणते.
 
अमिताभ बच्चन यांनी आपल्या भूमिकेला फारच उत्तम रित्या पार पाडले आहे. तसेच ऋषी कपूर ने देखील आपल्या भूमिकेद्वारे लोकांचे मन जिंकले आहे. दोन दिग्गज अमोर समोर आहे तर निश्चितच आहे की जे होईल ते अपेक्षेपेक्षा चांगलेच होईल. ऋषी, मुलाच्या भूमिकेत फारच जमले आहे. धीरूच्या रोलमध्ये जिमित त्रिवेदी यांनी चांगले काम केले आहे. ते बाप-बेट्याची मधील कडी आहे. पण चित्रपटाचे क्लायमॅक्स चित्रपटाच्या नेचरशी मॅच करत नाही.
 
म्युझिक स्लो आणि मेलोडियस आहे, पण चित्रपटाच्या फ्लो शी मॅच करत नाही आहे. सोनू निगमाचे गीत  'कुल्फी..' चांगले आहे. काही  ट्रेक जसे 'वक्त ने किया क्या..' आणि 'जिंदगी मेरे घर आना..' देखील चांगले आहे. चित्रपटाला तुम्ही म्हणून बघू शकता कारण यात एक मेसेज आहे. ते असे की जीवन जगण्याचे नाव आहे. चित्रपटात हे ही सांगण्यात आले आहे की जीवनात कोण्याच्या असण्याने किंवा नसण्याने तुम्ही तुमच्या सुखाशी समझोता करू नये. ...पण हो, चित्रपटापासून जास्त एंटरटेनमेंटची अपेक्षा करू नये.
 
 
क्रिटिक रेटिंग 3/5
स्टार कास्ट स्टार कास्ट अमिताभ बच्चन, ऋषि कपूर, जिमित त्रिवेदी
डायरेक्टर उमेश शुक्ला
प्रोड्यूसर ट्रीटॉप एंटरटेनमेंट, बेंचमार्क पिक्चर्स, सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट फिल्म्स इंडिया
म्यूजिक सलीम-सुलेमान, जॉर्ज जोसेफ
जॉनर कॉमेडी ड्रामा
ड्यूरेशन 1 घंटा 41 मिनट