1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:44 IST)

अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली, बच्चन यांनी केले नियोजित चित्रिकरण रद्द

amitabh bachhan

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची समजल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने अमिताभ बच्चन यांनी रविवारचे ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमाचे नियोजित चित्रिकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी रात्री अमिताभ यांनी रेकॉर्डींग स्टुडीओमध्ये ‘१०२ नॉट आऊट’ सिनेमामधील ‘भूडाम्ममममम’ गाणे रेकॉर्ड करताना व्हिडीओ पोस्ट केला होता. रॅप प्रकारातले हे गाणे स्वत: अमिताभ बच्चन यांनी लिहीले आहे. या गाण्याचा काही भाग शनिवारी रात्री उशीरा रेकॉर्ड करण्यात आला. त्याचा व्हिडीओही अमिताभ यांनी इन्स्ताग्रामवर शेअर केला होता.

रविवारची सकाळ संपूर्ण सिनेसृष्टीसाठी आणि सिने चाहत्यांसाठी वाईट बातमी घेऊन आली. याच कारणामुळे अमिताभ यांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने दिवसभराचे सर्व चित्रीकरण रद्द केले. २५ जानेवारी रोजी या सिनेमातील ‘भूडाम्ममममम’ गाण्याचे संपू्र्ण रेकॉर्डींग केले जाणार होते. अमिताभ यांच्या विनंतीवरूनच रविवारचे संपूर्ण चित्रिकरण रद्द करण्यात आले.