बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By

चित्रपटसृष्टीची मोठी हानी - विनोद तावडे

आपल्या अभिनय कौशल्याने  स्वतःची आगळी वेगळी छाप त्या भूमिकांवर सोडणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
श्री.तावडे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, हिंदी, मल्याळमसह विविध भाषांमधील चित्रपटांमधून श्रीदेवी यांनी केलेल्या भूमिकांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. अष्टपैलू भूमिका साकारणाऱ्या श्रीदेवी यांच्या अभिनयाची दखल घेत त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू अभिनेत्री गमावली आहे, असेही श्री.तावडे यांनी शेवटी म्हटले आहे.