शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (10:52 IST)

भावपूर्ण श्रद्धांजलि श्रीदेवी....

नेहमीच पहाटे  जाग येऊन अत्यंत प्रसन्न सकाळची सुरेख सुरवात होते, पण आज सकाळी प्रसन्न वाटण्या ऐवजी एकदम सुन्न झाल्या सारखेच झाले कारण बातमीच होती की हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अभिनेत्री श्रीदेवीचे निधन.
 
मनाला खूप वाईट वाटलं आणि मोठा धक्का ही बसला कारण एक चतुरस्त्र, प्रतिभासंपन्न, आणि अफलातून नृत्य कौशल्य असणारी आपल्या सहज,सुंदर अभिनयाने सर्वांची अत्यंत लाडकी क्षणात काळाच्या पडया आड जावी ही बातमी खरंच मनाला खूपच चटका लावून गेली.
 
सिने क्षेत्रात अश्या खूप कमी अभिनेत्री आहेत की हिरो ऐवजी हिरोईन ला जास्त महत्व आणि तिला मध्य वरती ठेवून चित्रपटाची निर्मिती होणं आणि हा मान श्रीदेवीने नक्कीच मिळवला होता  तिचा चालबाज हा चित्रपट याची साक्ष देणारा आहे आणि मिस्टर इंडिया मध्ये ही तिचा अफलातून अदाकारी ने तो चित्रपट मिस्टर इंडिया ऐवजी मिस इंडिया आपोआप होऊन गेला हे ही सत्यच आहे.
 
आमच्या कॉलेज जीवनात ही आमची अत्यंत लाडकी अभिनेत्री आणि तिच्या सर्व भूमिका मनाला खूप भावणाऱ्या होत्या हे तर अगदी खरं कारण तिने वठवलेल्या प्रत्येक भूमिकेत तिचा स्वतःचा असा एक निराळा आणि वेगळाच ठसा होता जो रसिकांना निर्विवादपणे आवडायचा त्या मुळे तिचे चित्रपट खूप हिट होत होते आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होतें
 
चांदनी, आणि लमहें या चित्रपटा साठी तिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते आणि तोहफा  जुदाई हे चित्रपट आणि एक अत्यंत संवेदनशील साकारलेली भूमिका म्हणजे सदमा हे हीच जबरदस्त अभिनयाची आणि नृत्य पारंगत असल्याची साक्ष देत राहतात. मॉम या  अभिनेत्रीचा चित्रपट क्रमांक तीनशे हिचा बॉली वूड अधिराज्य गाजवल्याची निरंतर साक्ष देतात. 
 
खरंच हृदय विकाराचा एक झटका क्षणात माणसाला कालवश करतो, पण आपल्या सारख्या रसिकांना ही, एक खूप मोठा असा मानसिक धक्का देऊन जातो हे हे अंतिम सत्य आहे. 
 
 अशीच अकाली एक्सिट घेतलेल्या रीमा लागू यांची या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण झाली आणि  जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला या उक्तीची आठवण झाली.
 
देव तिच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना