1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. manikarnika kanganaranawat

'मणिकर्णिका' च्या सेटवरील काही फोटो व्हायरल

manikarnika kanganaranawat

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये कंगनाने लाल रंगाची साडी नेसली आहे. साडीच्या काठपदरापासून ते दागिन्यांपर्यंत तिचा रॉयल लूक समोर येतो. या सिनेमात झांशीच्या राणीचे शौर्य दाखवण्यात येणार आहे. 

सिनेमात कंगना अनेक साहसी दृश्य करताना दिसणार आहे. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान कंगनाचे अनेक अपघातही झाले आहेत. तलवारबाजीचे दृश्य चित्रीत करत असताना तिच्या डोळ्याजवळ तलवार लागली. यात तिला टाकेही पडले.

यावर्षी १५ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील ब्राह्मण समुहाने ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला होता. यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमात दाखवण्यात आलेल्या कोणत्याही दृश्यामुळे राणी लक्ष्मीबाईची प्रतिमा मलिन होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. 

पुढील लेख
गुहांमध्ये वसलेले शहर...