बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (12:25 IST)

... म्हणून बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनची निवड

शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. पण बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीच का? याचे उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. संजय राऊत सोनू निगम, महिमा चौधरी आणि लेसले लेविस यांच्या भारतीय कला महोत्सवात सहभागी झाले होते. त्यावेळी राऊत यांनी या सिनोबद्दल अनेक हत्त्वपूर्ण माहिती दिली. सिनेमाविषयी सांगताना राऊत म्हणाले की, पहिल्यांदा आम्ही सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केला. हा ट्रेलर 24 तासात 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. आगामी काळात यात अजून वाढ होईल. या सिनेमाला संपूर्ण जगात चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी इतर कोणत्या कलाकारांच्या नावाचा विचार झाला का? असा प्रश्र्न संजय राऊत यांना विचारला असता, त्यांनी तत्काळ नकार दिला. नाही... या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी या एकात्र अभिनेत्याच्या नावाचीच चर्चा होती. असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.