सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:17 IST)

रजनीकांत आणि कमल हसन यांची भेट, चर्चेला उधाण

रजनीकांत आणि कमल हसन यांच्या भेटीनं तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात पु्न्हा चर्चेला उधाण आले आहे. कमल हसन यांनी रजनीकांत यांच्या घरी स्नेहभोजन केले. ही सदिच्छा भेट घेतली. राजकीय दौऱ्याची माहिती देण्यासाठी रजनीकांत यांची भेट घेतल्याचं कमल हसन यांनी यावेळी सांगितलंस त्याला रजनिकांत यांनीही दुजोरा दिला. कमल हसन यांनी राजकारणात केवळ प्रसिद्धीसाठी पाऊल ठेवलेले नाही, तर तामिळनाडूतील लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. 

या कार्यात त्यांना यश मिळो, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे रजनीकांत म्हणाले. 21 फेब्रुवारीला कमल हसन आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. तर रजनिकांत यांनीही तामिळनाडूत विधानसभेच्या सर्व 234 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय.या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.