सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (09:41 IST)

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप

ज्येष्ठ अभिनेते  जितेंद्र यांच्यावर  त्यांच्या चुलत बहिणीने  लैंगिक छळाचा आरोप केला आहे.  याप्रकरणी जितेंद्र यांच्याविरोधात हिमाचल प्रदेशमधील पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण 47 वर्षापूर्वीचे आहे. 

“मी 18 वर्षांची होती, तेव्हा जितेंद्र यांनी मला शूटिंग दाखवायला नेले. शूटिंग बघायला मिळालं म्हणून मी खुश होते. पण तिथे गेल्यावर मी विचार केला नव्हता असे घडले. जितेंद्र यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी जर हे आई-वडिलांना कळले असते, तर त्यांच्यासाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली असती म्हणून मी शांत राहिले.”, असा आरोप महिलेने केला आहे. 

पीडित महिलेने त्या घटनेनंतर अनेक वर्ष आपण त्या धक्क्यात असल्याचं म्हटलं आहे. मात्र अत्याचार झालेल्या मुली समोर येऊन तक्रार दाखल करत आहेत. यातूनच हिंमत मिळाली असून अत्याचाराविरोधात तक्रार दाखल केल्याचं पीडित महिलेनं म्हंटलं आहे. महिलेने पोलिसांना तिची ओळख उघड न करण्याची विनंती केली आहे.