शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (17:36 IST)

आर. डी. बर्मन जीवनगौरव अमीन सयानी यांना !

१० फेब्रुवारीला रंगणार सोहळा
‘मॅजिकल पंचम'मध्ये आरडींच्या अखेरच्या मुलाखतीची झलक
 
‘मॅजिकल पंचम'या कन्सेप्ट शोचा आर. डी. बर्मन जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांना जाहीर झाला आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी मुलुंड पश्चिम येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात रात्री ८ वाजता रंगणाऱ्या सोहळ्यात सयानी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यावेळी सयानी यांनी घेतलेल्या आरडींच्या अखरेच्या मुलाखतीचा अंश आणि त्यांची सुमधूर गीतं रसिकांना ऐकता येतील.
स्वरदा कम्युनिकेशन्स अँड इव्हेट आणि लॅपिस मिडीया ॲण्ड कम्युनिकेशन्स यांच्या वतीने  ‘मॅजिकल पंचम' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रेडियोच्या माध्यमातून पंचमदांची गाणी रसिकांपर्यंत पोचवणारे आणि पंचमदांचे अस्सल चाहते अमीन सयानी यांचा गौरव होणार आहे. सयानी यांनी ‘बहनों और भाईयो, अगली पायदानपें है ये गाना...' असे म्हणत अनेक वर्षे रेडीयोवर बिनाका गीतमाला सादर केली. शैलीदार आणि रसाळ निवेदनाने ते संगीतप्रेमींच्या
गळ्यातील ताईत बनले. अमीनजींनी केवळ निवेदन केले नाही तर अनेक गायक, गीतकार संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते करून त्यांचा गाण्यांचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला आहे. अमीनजीनी आर. डी. बर्मन
यांची अखेरची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचे काही अंश ‘मॅजिकल पंचम' कार्यक्रमात रसिकांना बघता येईल. पंचमदांच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी आहे. या कार्यक्रमात पंचमदांनी संगीतबद्ध केलेली एकापेक्षा एक सरस गाणी अनुभवता येतील. गायक श्रीकांत नारायण, आलोक काटदरे, मनिषा जांबोटकर, प्राजक्ता सातार्डेकर ही ओल्डमेलडी सादर करतील.