बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.  या पोस्‍टरमध्‍ये सुशांत सिंह राजपुत असून तो डाकूच्‍या वेशभूषेत दिसत आहे. चित्रपटात मनोज वाजपेयी, रणवीर शोरे, आशुतोष राणा यांच्‍याही भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा चंबळ खोर्‍यातली असून १०७० च्‍या दशकातल्‍या घटनांवर आधारित आहे. यात मुख्‍य भूमिकेत भूमि पेडनेकर असून १९७० च्‍या दशकातल्‍या एका महिलेची भूमिका ती साकारत आहे. चंबल गावाची महिला दिसण्‍यासाठी भूमि बरीच मेहनतदेखील करत आहे.