सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात ईशानने धोबी घाटमधील एका मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ट्रेलरवरून सिनेमाची कथा मुंबई शहरात फिरणारी आहे हे स्पष्ट दिसते. सिनेमात त्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका मल्याळम अभिनेत्री मालविका मोहननने साकारली आहे. येत्या २३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला ए.आर. रेहमानचं संगीत आहे. हा सिनेमा हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ईशानला या सिनेमासाठी टर्की येथील बोस्फोरुस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.