शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (09:43 IST)

अभिनेता अभिषेक बच्चनचे ट्विटर अकाऊंट हॅक

अभिनेता अभिषेक बच्चनचे ट्विटर अकाऊंट प्रो पाकिस्तानी तुर्की सायबरने हॅक केले. त्याचबरोबर त्यावरून तुर्की आणि इंग्रजीमध्ये ट्वीट केले. त्यावर तुर्कीचा झेंडा देखील लावण्यात आला. त्यावरचे JuniorBachchan हे  नाव बदलून JuniorBachchana असे करण्यात आले. यापूर्वी अनुपम खेर, राज्यपाल किरण बेदी, भाजपा महासचिव राम माधव, राज्यसभा सदस्य स्वप्न दासगुप्ता यांचेही ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहेत.

यावर ट्विटरने ऑफिशियल पोस्ट करून सांगितले की, आमची टीम या इशूवर काम करत आहे. समस्या सुटल्यानंतर अकाऊंट होल्डरला थेट कळवण्यात येईल. तोपर्यंत अननोन अकाऊंटवरुन येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.त्याचबरोबर ट्विटरने सर्व अकाऊंट धारकांना सुचित केले आहे की, तुमच्या डिरेक्ट मेसेजमध्ये येणारी कोणतीही लिंक ओपन करु नका. त्या कितीही खऱ्या वाटल्या तरी. ह्याच माध्यमातून हॅकर्स अकाऊंट हॅक करतात. हा मेसेज सर्वांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन ट्विटरद्वारे करण्यात आले आहे.