सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (14:36 IST)

भन्साळीला शाहरूख खानचा दोनदा नकार

शाहरूख खानने संजय लीला भन्साळीसोबत 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट देवदासमध्ये काम केले होते. त्यानंतर शाहरूखने भन्साळीसोबत एकदाही काम केलेले नाही. दिग्दर्शक संजय भन्साळीने दोन वेळा शाहरूखला ऑफर दिली होती. मात्र, त्याने दोन्ही वेळेस नकार दिला. त्यामुळे शाहरूखला भन्साळीच्या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. किंग खानने भन्साळीच्या दोन चित्रपटांना नकार दिला आहे. विशेष म्हणजे, नुकताच प्रदर्शित झालेल्या पद्मावत चित्रपटातील अलाउद्दीन खिलजीची भूमिका त्यापैकी एक आहे. ही भूमिका साकारण्यासाठी अनेक वेळा संजय लीला भन्साळी शाहरूख खानकडे स्क्रिप्ट घेऊन जात होते. मात्र, प्रत्येकवेळी शाहरूख इतर चित्रपटात व्यस्त असल्याने त्यांना नकार देत होता. त्यानंतर रणवीर सिंहने ही भूमिका उत्कृष्टपणे साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. दरम्यान, चित्रपटासाठी नकार देऊनही या दोघांध्ये कोणतेही मतभेद नसून ते चांगले मित्र आहेत. पद्मावतच्या यशानंतर संजय लीला भन्साळीने रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणसोबत तीन चित्रपट साईन करून घेतले आहेत.