सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रिया प्रकाशला करायचे भन्साळीसोबत काम

सोशल मीडियावर अवघ्या काही मिनिटांतच अधिराज्य गाजवलेली किंबहुना अजूनही गाजवणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वरीअर सध्या चर्चेला विषय ठरली असून तिचे नशीब आगामी उरु अदार लव्ह या चित्रपटातील मानिक्य मलरयापूवी या गाण्यामुळे रातोरात बदलले. सोशल मीडियावर तिच्या या गाण्याची एक क्लिप तुफान व्हायरल होत असून प्रियाला आता मल्याळमसोबतच, तमिळ, तेलुगू आणि बॉलीवूडमधूनही ऑफर्स मिळत आहेत.
 
प्रियाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिला भरभरुन मिळत असलेल्या प्रसिद्धीबाबत प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर पद्मावत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त ‍केली. हे जे काह घडले ते सर्व काही अचनाक घडले. माझा हा पहिला चित्रपट असून मला फक्त दिग्दर्शकांनी हावाभाव करण्यास सांगितले आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला.
 
मी मळा मिळत असलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानते. मी आणि माझे कुटुंबीय ख़श आहोत, पण या प्रसिद्धी कसे हाताळायचे हेच आम्हाला समजत नसल्याचे ती म्हणाली. बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा यावेळी व्यक्त करत ती पुढे म्हणाली की, मला सध्या मल्याळम, तमिळ आणि बॉलीवूड चित्रपटांच्या बर्‍याच ऑफर्स मिळत आहेत. अद्याप मी कोणालाच होकार दिलेला नाही. मी बॉलीवूडमध्ये नक्कीच काम करेन. माझी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्‍छा आहे.