बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रिया प्रकाशने फॅन्सचे मानले आभार

रातोरात स्टार बनलेल्या प्रिया प्रकाश या नवोदित अभिनेत्रीने तिच्या अंदानी सगळ्यांनाचा घायाळ केलं आहे. प्रियाच्या डोळ्यांनी व तिच्या भूवयांच्या अदाकारीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रिया प्रकाश मल्याळम सिनेमा 'ओरू अदार लव'मधील 'मलरया पूवी'मध्ये दिसते आहे.
 
प्रियानं अनेक दिग्गजांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रिया प्रकाश वारियरला एका दिवसात तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे.  यासहीत सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो होणा-या सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया आता अमेरिकेची मॉडेल काइली जेनर आणि फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत पोहोचली आहे.