रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने बॉयफ्रेंड!

व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने भाड्याने बॉयफ्रेंड मिळण्याची ऑफर देण्यात आली आहे. गुरुग्राम येथील एका व्यावसायिकाने सिंगल मुलींसाठी स्वत: भाड्याने बॉयफ्रेंड बनू शकतो अशी ऑफर दिली आहे. शकूल गुप्ता नावाच्या या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट लिहून मुलींसाठी विविध पॅकेज दिले आहेत.
 
पहिल्या पॅकेजमध्ये: हात पकडने आणि खांद्यावर हात ठेवणे. दुसर्‍या पॅकेजमध्ये: हात धरणे, खांद्यावर हात ठेवणे, हग, गाल आणि कपाळावर किस. तिसर्‍या पॅकेजमध्ये लिप किस सामील असनू चौथ्या पॅकेजमध्ये: आपल्या आवडीप्रमाणे असे सामील करण्यात आले आहे.
 
फेसबुकच्या या पोस्टवर हजारों लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. मुलाचे वय 26 असून उंची 160 सेमी आहे. त्याच्याप्रमाणे त्याला बघून मुलीचे पालक आणि मित्र खुश होतील. तसेच तो सर्व प्रकाराचे जेवण बनवू शकतो आणि सोबत नेटफ्लिक्स बघू शकतो असेही सांगितले आहे.
 
काही गमतीशीर अटीही या व्यक्तीने घातल्या आहेत. बॉयफ्रेंड बनल्यानंतर संबंधित मुलीसोबत फॅशनसंदर्भात चर्चा करणार नाही, तसेच तिच्यासाठी झुरळांना पळवणार नाही.