मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाकिस्तानकडून सईद दहशतवादी घोषित

पाकिस्तानने अखेर मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला आणि त्याची दहशतवादी संघटना जमात उद दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे (यूएनएससी) प्रतिबंधित व्यक्ती आणि लष्कर ए तोयबा, अल कायदा तसेच तालिबानसारख्या संघटनांना लगाम घालण्याचा उद्देश असलेल्या एका अध्यादेशावर राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी स्वाक्षरी केली आहे. या सूचीत हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात उद दावाचाही समावेश आहे.
 
आतापर्यंत पाकिस्तानने जमात उद दावासारख्या संघटनांचा फक्त दहशतवादी संघटनांच्या सूचीत समावेश केला होता. पाकिस्तानकडून कधी बंदीची चर्चा केली जात तर कधी या संघटनेला देणगी घेण्यावर बंदी लादण्याची चर्चा केली जात. पण आता राष्ट्रपतींद्वारे अध्यादेशावरील स्वाक्षरीनंतर जमात उद दावा अधिकृतरित्या दहशतवादी संघटना ठरली आहे. यातून पाकिस्तान स्वत:ला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचे हे पाऊल निव्वळ धुळफेक असल्याचेही बोलले जात आहे. कारण अध्यादेश हा ठराविक काळानंतर संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे जर पाकिस्तानने वेळेत कायदा केला नाही तर ही सरळसरळ धुळफेकच असेल, असे बोलले जात आहे.