गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (13:28 IST)

मला अटक करून दाखवाच : सईद

पाक सरकारला मला अटक करायची असेल, तर त्यांनी यावे आणि मला अटक करून दाखवावे. पण, आम्ही काश्मीरसाठी सुरू केलेला लढा थांबविणार नाही, असा इशारा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि 'जमात-उल-दावा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने पाक सरकारला दिला आहे. 
 
हाफिज म्हणाला, आमच्यावर तुम्ही कितीही दबाव टाकला तर अधिक जोराने आम्ही पुढे येऊ. काश्मीरबाबत योग्य न्याय झाला नसल्याने आम्ही लढाई सुरू ठेवणार आहे.