1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दवाखान्यात हल्ला करून लष्कर कमांडरला दहशतवाद्यांनी सोडवले

terrorists-attack-on-maharaja-hari-singh-hospital-in-jammu-kashmirs-srinagar
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर स्थित महाराजा हरि सिंह दवाखान्यात मंगळवारी दुपारी सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.  
 
मिळालेल्या वृत्तानुसार, पोलिस येथे लष्कर कमांडर नावेद जट्ट उर्फ अबू हंजला समेत सहा दहशतवाद्यांना मेडिकल चाचणीसाठी दवाखान्यात घेऊन गेली होती. या दरम्यान काही सशस्त्र दहशतवाद्यांनी दवाखान्यात घुसून गोळ्या चालवणे सुरू केले. या गोळीबारात एका पोलिसकर्मीचा मृत्यू झाला आहे, व एक जखमी झाला आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी अबू हंजला देखील पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. तसेच सुरक्षाबळांनी त्या भागाला घेरले आहे आणि दहशतवाद्यांच्या धर-पकडसाठी शोध मोहीम सुरू केली आहे.