शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (16:12 IST)

मोदींचा आखाती देशात दौरा, रंगणार ऐतिहासिक सोहळा

येत्या 11 फेब्रुवारी रोजी विक्रमी संख्येने उपस्थित राहणाऱ्या भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. फेब्रुवारी 9 ते 12 या दरम्यान हा दौरा असून मस्कत, ओमान इथं ऐतिहासिक सोहळा रंगणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

ओमानमध्ये मोदींविषयी प्रचंड कुतूहल असून मस्कतच्या सुलतान कुबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मोदींचं अनिवासी भारतीयांच्या सभेत भाषण ठेवण्यात आले आहे. ओमानमधलं हे सगळ्यात भव्य स्टेडियम आहे. पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकण्यासाठी इथं खूपच उत्सुकता आहे असं ओमानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. अबू धाबीमध्ये पहिलं मंदीर बांधण्यात येणार असून या मंदिराच्या शिला – पूजन समारंभाची व्हिडीयो लिंकही मोदींना या दौऱ्यात बघायला मिळणार आहे. पश्चिम आशियातील हा दौरा मोदींसाठी या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आखाती देशांमध्ये केवळ दुबईमध्ये हिंदूंचे एकमेव मंदिर आहे.