शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पाकड्याला कधी धडा शिकवणार- शिवसेना

पाकीस्थान रोज उल्लघन करत आपल्यावर हल्ला करत आहे. तर आपले राज्यकर्ते नुसते बोलत असून कोणताही निर्णय घेत नाहीत, त्यामुळे आता किती दिवस आपन वाट बघायची आहे. अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासारख्या देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचे वचन पूर्ण करण्याचा मर्दानी बाणा दाखविणाऱ्यांचा हा सवाल आहे.  असा प्रश्न सामना वृत्त पत्रातून शिवसेना विचारत आहे. किती सैनिक आपले जीवन असेच वाहून घेणार, आता वेळ आली आहे पाकड्याला अद्दल घडवण्याची अशी मागणी शिवसेना करत आहे.

शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावरून काढून युद्धात वापरायची असतात. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. आमचे राज्यकर्ते हे कधी करणार? शस्त्रसंधीचे उल्लंघन या शब्दाच्या भूलभुलैयातून बाहेर पडून सीमेपलीकडून होणारे हल्ले हे पाकड्य़ांनी आपल्याविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे हे वास्तव आपण कधी मान्य करणार आणि पाकड्य़ांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर कधी देणार? शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासारख्या देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचे वचन पूर्ण करण्याचा मर्दानी बाणा दाखविणाऱ्यांचा हा सवाल आहे. 

पाकड्य़ांच्या सीमेपलीकडून होणाऱ्या कुरापती थांबलेल्या नाहीत. त्यांचे शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार आणि दहशतवादी हल्ले यात आपण दर तीन दिवसांआड आपला एक जवान गमावत आहोत. आता रविवारी कपिल कुंडूसारखा २२ वर्षांचा होनहार कॅप्टन आणि तीन जवान गमावले. मग त्या सर्जिकल स्ट्राईकचा किंवा दहशतवाद्यांच्या खात्म्याचा काय परिणाम पाकिस्तानवर झाला, असा प्रश्न पडतो. तो झालेला नाही असाच रविवारी त्यांनी पुन्हा केलेल्या गोळीबाराचा आणि कपिल व इतर तीन जवानांच्या हौतात्म्याचा अर्थ आहे. मात्र हे किती काळ चालणार? लष्करी जवानांचे आयुष्य म्हणजे ‘बडी जिंदगी’च असते आणि ते त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठीच वाहिलेले असते हे मान्य केले तरी राज्यकर्त्यांच्या धोरणांमुळे आमचे सैनिक युद्धाशिवाय शहीद होण्याचा सिलसिला किती काळ सुरू राहणार आहे. पाकिस्तान कालपर्यंत सीमेपलीकडून गोळीबार करीत होता. उखळी तोफांचा मारा करीत होता. आता त्यांनी छोटी क्षेपणास्त्र डागण्याची आगळीक केली. आम्ही त्याला जशास तसे प्रत्युत्तर कधी देणार? की आम्ही आमची क्षेपणास्त्र दिल्लीतील राजपथावरील संचलनात परदेशी पाहुण्यांसमोरच मिरवीत राहणार? शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावरून काढून युद्धात वापरायची असतात. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. आमचे राज्यकर्ते हे कधी करणार? शस्त्रसंधीचे उल्लंघन या शब्दाच्या भूलभुलैयातून बाहेर पडून सीमेपलीकडून होणारे हल्ले हे पाकडय़ांनी आपल्याविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे हे वास्तव आपण कधी मान्य करणार आणि पाकड्य़ांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर कधी देणार? शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासारख्या देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचे वचन पूर्ण करण्याचा मर्दानी बाणा दाखविणाऱ्यांचा हा सवाल आहे.