सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (11:57 IST)

मोदीमुंळे लटकले मेरी कोमचे 'ड्रीम प्रोजेक्ट'

भारताची पाचवेळची जगज्जेती हिला बॉक्सर ए.सी. मेरी कोचा ड्री प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लटकला आहे. मेरी कोमने मणिपूरची राजधानी इंफाळपासून 10 किलोमीटर दूर लांगोल हिल्स येथे एक बॉक्सिंग अकादमी तयार केली आहे. ही अकादमी दोन वर्षांपूर्वी तयार झाली आहे. पण औपचारिक उद्‌घाटनासाठी अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहात आहे. यासाठी मेरी कोमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणा केली होती. पण त्याचे अजून उत्तर मिळालेल नाही. त्यामुळे मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्ट तयार होऊनही सर्वांसाठी खुला झालेला नाही.
 
दरम्यान, मेरी कोम आपल्या अकादमीच्या विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. तीन एकर क्षेत्राध्ये तयार झालेल्या या अकादमीत सध्या 25 तरुण आणि 20 महिला बॉक्सिंगचे धडे घेत आहेत. तीन मजली इमारतीमध्ये बॉक्सिंगसाठी लागणार्‍या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. 
 
मेरी कोमचे पती आणि अकादीचे मुख्य ओनलर कारोंग म्हणाले की, मेरी बॉक्सिंगला काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करतेय. तिला ज्या अडचणीचा सामना करावा लागला तो इतरांना लागू नये. हा तिचा उद्देश्य आहे. या अकादमीतून अनेक युवा-युवतीला बॉक्सिंगचे धडे मिळतील. या अकादमीची निर्मिती म्हणजे मेरी कोमचे स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. मणिपूर आणि देशातील अन्य भागात ती अशाच प्रकारच्या अकादमी उघडण्याचे स्वप्न पाहात आहे.
 
आधुनिक साहित्य आणि सुविधा असलेली ही भारताची पहिलीचअकादमी असल्याचे मत मेरी कोमच्या पतीने व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, ही अकादमी तयार होऊन दोन वर्ष झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उद्‌घाटन करावे असे आम्हाला वाटते. 
 
ओनलर पुढे म्हणाले की, क्रीडा सचिवाने अकादमीला भेट दिली आहे. त्याचप्राणे याबाबत पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्र्यांसोबत तीन वेळा भेटही झाली आहे. यावेळी आम्हाला आश्वासन देण्यात आले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्‌घाटनाला येतील. आम्हाला आशा आहे की, यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉक्सिंग अकादमीचे उद्‌घाटन करतील.