शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (11:50 IST)

धक्कादायक शेतकऱ्याकडून एक लाख लाचेची मागणी

उस्मानाबाद येथील एका शेतकऱ्याकडून महावितरणच्या एका अभियंत्याने एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली आहे. त्याला लाच घेताना अटक केली आहे. यामध्ये शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करण्यासाठी आणि नवीन   बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली. तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावात  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात  बोअर वेल विजेचा डीपी नादुरुस्त असल्याने मागील  ६ महिन्यापासून बंद होता. हाच  डीपी दूरुस्त करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये त्यांना  पहिला १ लाख रुपये लाचेची हप्ता मुरूम मोड येथे घेताना महावितरणचा सहायक अभियंता सुधीर बुरनापल्ले , वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग सिद्धराम जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महावितरण मोफत वीज देत असून शेतकरी वर्गाला आकर्षित करत आहेत. उस्मानाबाद येथील हा प्रकार समोर आला आणि अनेक शेतकरी संघटना नाराज झाल्या आहेत.