शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:18 IST)

डीएसके १ फेब्रुवारीपर्यंत पैसे जमा करणार

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींना हायकोर्टाने ५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. ठेवीदारांची देणी परत करण्यासाठी डीएसकेंना हायकोर्टात ५० कोटी रुपये जमा करायचे आहेत. गुरुवारी देखील डीएसके ही रक्कम जमा करण्यात अपयशी ठरले. ‘५० कोटी रुपये बँकेत जमा होणार आहे. हे पैसे परकीय चलनात म्हणजे डॉलर्समध्ये आल्याने सध्या आरबीआय पडताळणी करत आहे. १ फेब्रुवारीपर्यंत हे पैसे जमा करु’, अशी माहिती डीएसकेंच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली. परदेशातील डीएसकेंच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून या ५० कोटी रुपयांची तजवीज करण्यात आल्याने ही रक्कम परकीय चलनात आली आहे.