शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2018 (16:49 IST)

शेअर बाजार ऐतिहासिक टप्प्यावर

share marekt

भारतीय शेअर बाजाराने  ऐतिहासिक टप्पा ओलांडत सेन्सेक्सने विक्रमी कामगिरी केली.बुधवारी सेन्सेक्स २५० ने वाढून तो ३५ हजाराच्या वर स्थिरावला. तर निफ्टीनेही दिवसअखेर १०, ७७७ टप्पा ओलांडला.

रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांनी पश्चिम बंगालमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भारत दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यात अनेक करारांवर स्वाक्षरी होणार आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले. येत्या वर्षभरांत सेन्सेक्स ४० हजारांचाही टप्पा ओलांडेल असा विश्वास  तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.