बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (08:49 IST)

‘एक्झाम वॉरिअर्स’ पुस्तकातून मोदी विद्यार्थ्यांच्या भेटीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुस्तकाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘एक्झाम वॉरिअर्स’ असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकांच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा हाताळावा यावर मार्गदर्शन करणार आहेत. 

मोदींनी लिहिलेलं हे पुस्तक ३ फेब्रुवारीला प्रकाशित होईल. इंग्रजीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषेत हे पुस्तक उपलब्ध होणार आहे.  पेंग्विन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. ’विद्यार्थी हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणूनच हा विषय मी लिखाणासाठी निवडला’ असं मोदींनी म्हटलं आहे.