बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (08:48 IST)

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन मित्रांना अटक

दिल्लीतील करावलनगरमध्ये ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. तुषार (१६) असे मृत्यू  विद्यार्थ्यांचे नाव असून तो   शाळेच्या स्वच्छतागृहात बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता  त्याला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, शाळेच्या आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन स्वच्छतागृहाच्या बाजूला काही विद्यार्थ्यांबरोबर तुषारचे भांडण झाल्याचे कळते. ज्या तीन विद्यार्थ्यांबरोबर त्याचे भांडण झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीघेही अल्पवयीन आहेत. यातील एक विद्यार्थी फरार झाला आहे.

मृत तुषारच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, तुषारला त्याच्या वर्गमित्रांनी मारहण केली होती. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. पालकांच्या मागणीवरुन या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मृत विद्यार्थ्याचे शवविच्छेदन केले जाणार आहे.