1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

पुन्हा एकदा जिओ ४ जी मोबाईल फोनची विक्री सुरु

reliance jio phone

रिलायन्स जिओने ४ जी मोबाईल फोनची पुन्हा एकदा विक्री सुरु केली आहे. सुरुवातीला हा फोन बुकींग करुनही काही लोकांना मिळाला होता. आता www.jio.com या कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून हा मोबाईल विकत घेता येईल. जिओचा ४ जी फीचर फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना १५०० रूपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. १५०० रूपयांची ही अनामत रक्कम तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. त्यामुळे हा फोन मोफत मिळणार आहे. 

जिओचा फोन घेण्यासाठी..

- जिओच्या www.jio.com या संकेतस्थळावर गेल्यावर  नाऊ ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर  मोबाईल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा.
- मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर डिटेल्स मागितले जाईल. त्या डिटेल्समध्ये पोस्टल कोड टाका. 
- जर दुसऱ्या नावांनी मोबाईल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करा. दुसरा मोबाईल नंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा. 
- प्रोसीड केल्यानंतर मोबाईलसाठी द्यावी लागणारे  १५०० रूपये भरा.  पे या ऑप्शनवर क्लिक करा आणि पैसे भरा.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर  मोबाईलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा ४जी फीचर फोन मिळणार आहे.