शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अमरावती: नियोजन करत भाडेकरूने केला घरमालकिणीचा खून

अमरावती येथे एका खुनाच्या घटनेत मोठा प्रकार समोर आला आहे. ज्या घरमालकीनिणे विश्वास ठेवला तिलाच तिच्या भाडेकरूने मारून टाकले आहे. हा सर्व प्रकार पोलिसांनी शोधून काढाल आहे. भाडेकरूने तिच्या पैशांवर डोळा ठेवून नियोजनबद्ध खून केला असे तपासात उघड झाले आहे . भाडेकरूने खुनानंतर त्याने पोलिसांपुढे वेगळीच कथा रचली होती. पोलिसांनी  मात्र, एटीएमच्या सीसीटीव्ही च्या सहय्याने हा सर्व प्रकार शोधून काढला आहे. यातील मृत  शैलजा निलंगे हत्याकांडात हा घटनाक्रम समोर  आला आहे.
 
आरोपी धीरज शिंदे (२३, मूळ रहिवासी आसेगाव पूर्णा) याने गुरुवारी रात्री उशिरा शैलजा निलंगे यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडून पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेतला आहे.  मंगळवारी रात्री शैलजा यांचे जेवण झाल्यानंतर तो त्यांच्या खोलीत गेला. त्याने शैलजा यांना पाच हजारांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून त्याला नकार मिळाला. यामुळे खवळलेल्या धीरजने शैलजा यांना पलगांवर ढकलले आणि त्यानंतर उशीने तोंड दाबले आणि रुमालाच्या साहाय्याने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर रात्री उशिरा तो आपल्या खोलीत परतला. काही तासानंतर पुन्हा उठून त्याने चोरलेले एटीएम वापरून शैलजा निलंगे यांच्या खात्यातून रक्कम काढली. 
 
पोलीस सूत्रानुसार, शहरातील जलारामनगरातील घरात शैलेजा निलंगे यांची उशीने तोंड दाबल्यानंतर गळा आवळून हत्या केल्याचे बुधवारी उघड झाले आहे. त्यामुळे आता भाडेकरू ठेवताना पूर्ण खात्री आणि सुरक्षा पाहुणचा ठेवावा लागणार आहे.