रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (15:56 IST)

अबब, 47 लाख रुपये किंमतीचा साप, तस्करांना अटक

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी पकडण्यात आली आहे. यात  आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये किंमत असलेला मांडूळ जातीचा साप हस्तगत केला आहे. सोबतच  हुसेन कोंडीबा तांबोळी (64 ), लतीफ हुसेन जमादार ( 65) यांना  अटक करण्यात आली आहे. या सापाचे वजन सुमारे  3 किलो आहे. याप्रकरणी  मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.