1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (16:04 IST)

तलावात एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या

एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये  राज्याची उपराजधानी असलेल्या  नागपुर येथील प्रसिद्ध असलेल्या  फुटाळा तलावात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकारात मृतांमध्ये नवरा, बायको आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा देखील  समावेश आले. यामध्ये  निलेश शिंदे वय ३५, रूपाली शिंदे वय ३२ आणि निहाली शिंदे वय वर्षे पाच या तिघांनी या तलावात उडी मारून  आपले जीवन संपवलं आहे.  शुक्रवारी मध्य रात्री फार  उशिरा या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे तिघेही नागपुरातील तेलंखडी हनुमान मंदिर परिसरात  रहिवासी होते. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले आहेत. या तिघांनीही आत्महत्या नेमकी का केली हे समजू शकलेले नाही.