बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018 (09:08 IST)

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई केली आहे. ज्या व्हिडिओतील ही क्लिप व्हायरल झाली होती तो ट्रेलरही मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. यूट्यूबवर याचे व्ह्यूज खूप वाढले आहेत. मल्याळम सिनेमा ‘ओरू अदार लव्ह’चा ट्रेलर ५ दिवसांपूर्वी अपलोड केला गेला होता. आतापर्यत हा ट्रेलर १.५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. 

यूट्य़ूबवर अपलोड झालेल्या व्हिडिओतून कमाईची आकडेवारी एका वेबसाईटने जारी केली आहे. त्यानुसार  हा व्हिडिओ अपलोड करणा-या यूट्यूब चॅनलने ७६०० डॉलर ते ६०८०० डॉलरची कमाई केली आहे. भारतीय मुद्रेत ही रक्कम ५ लाख ते ३९ लाख रूपये इतकी आहे. या चॅनलने प्रिया प्रकाशच्या सिनेमातील आणखी एक टीझर अपलोड केलाय. सोशल ब्लेडच्या आकडेवारीनुसार टीझरमुळे १७००-१३७०० डॉलर म्हणजेच १.१० लाख रूपये ते ८.८ लाख रूपयांपर्यंत कमाई केली गेली आहे.