मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गाडीच्या चाकात केस अडकून महिलेचा मृत्यू

हरयाणातील  भटिंडात  गो -कार्ट गाडीत बसलेल्या एका महिलेचे केस गाडीच्या चाकात अडकून डोक्याची त्वचा खेचली गेल्याने मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. पुनीत कौर असे महिलेचे नाव आहे. 
 
पुनीत कौर यांचे काही नातेवाईक कॅनडाहून त्यांच्या घरी आले होते. त्या नातेवाईकांना फिरवण्यासाठी ते भटिंडा शहरात आले होते. भटिंडा शहरात फिरल्यानंतर त्यांनी यादविंद्रा गार्डनमध्ये जाण्याचे ठरविले. तेथे गेल्यानंतर ते गो कार्ट गाड्यात बसले. त्यावेळी पुनीत यांचा नवरा सोबत एका गाडीत बसले होते. गाडी सुरू झाल्यानंतर पुनीत यांचे मोकळे केस गाडीच्या चाकात अडकले. त्यावेळी गाडी फार वेगात होती. त्यामुळे पुनीत यांचे केस डोक्याच्या संपूर्ण त्वचेसहित खेचले गेले व डोक्यापासून केस वेगळे झाले. या अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.