गुरूवार, 11 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑगस्ट 2025 (21:26 IST)

पालघरमधील औषध कंपनीत नायट्रोजन वायू गळतीमुळे चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पालघरमधील औषध कंपनीत नायट्रोजन वायू गळतीमुळे चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या एका औषध कंपनीत नायट्रोजन वायू गळतीमुळे चार कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १३० किमी अंतरावर असलेल्या बोईसर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मेडली फार्मा येथे दुपारी ही घटना घडली अशी माहिती समोर आली आहे. 
अधिकारींनी सांगितले की, सहा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सायंकाळी ६.१५ च्या सुमारास चार जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, इतर दोघांना स्थानिक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
तसेच कंपनीत अल्बेंडाझोल औषध तयार केले जात होते. या दरम्यान नायट्रोजन वायू मिसळताना अचानक गळती झाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Edited By- Dhanashri Naik