बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मनिकया मलराया पुवी... मुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियार हिच्या नेत्रकटाक्षामुळे चर्चेतील मल्याळम चित्रपट ‘ओरू अदार लव्ह’च्या दिग्दर्शकावर हैदराबादेत एफआयआर दाखल झाला आहे. ‘मनिकया मलराया पुवी...’ या गीतामुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. 
 
वसायिक जहीर अली खान, अभियांत्रिकीचा विद्यार्थी मुकीथ खान आणि इतरांच्या फिर्यादीनुसार ओमर लुलू लिखित गीतात मोहंमद पैगंबर यांच्या पत्नीचा आक्षेपार्ह पद्धतीने उल्लेख केला आहे. हे गीत काढून टाकावे किंवा त्यातील शब्द बदलावेत, अशी त्यांची मागणी आहे. अभिनेता व अभिनेत्रीबद्दल आपल्याला आक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एसीपी एईद फय्याज म्हणले, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी मुस्लिम विद्वानांचे मत जाणून घेतले जाईल.
 
हे गीत इस्लामविरोधी नाही. उलट यात मोहंमद साहब यांची स्तुती आहे. हे एक पारंपरिक मुस्लिम गीत आहे. व्हिडिओत काही मोजकी दृश्ये असल्याने ते रोमँटिक असल्याचा अाभास निर्माण होत आहे दिग्दर्शक ओमर लुलू ने सांगितले आहे.