मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (15:15 IST)

जुही चावलाने असा सुचवला पर्यावरणपूरक पर्याय

अभिनेत्री जुही चावलाने ट्विटर हॅंडलवरून एक पर्यावरणपूरक पर्याय सूचवला आहे. यात तिने प्लास्टीकला पर्याय सुचवला आहे.या पर्यायाचे अनेकांनी स्वागत केले असून तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

जुही चावलाने आपल्या ट्विटर हॅंडलवर एक छायाचित्र शेअर केले आहे. हे छायाचित्र नारळाच्या रिकाम्या शहाळ्याचे आहे. या शहाळ्यांचा तिने योग्य वापर करत आपण टाकाऊ वस्तूचाही कसा योग्य पद्धतीने वापर करू शकतो हे दाखवून दिले आहे. आपल्याकडे पाणी पिऊन झाल्यावर नारळाची रिकामी शहाळी टाकून दिली जातात. दुसरीकडे रोप लावताना प्लास्टीक बॅगचा वापर केला जतो. नेमकी हीच बाब ओळखत जुहीने हो फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत नारळाच्या रिकाम्या शहाळ्यात रोपटी लावलेली दिसतात.