मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 मार्च 2018 (09:14 IST)

छोट्याशा चुकीबद्दल अमिताभ यांनी मागितली माफी

तिरंगी मालिकेत भारताच्या  विजयानंतर दिनेश कार्तिकचे कौतुक होत आहे. यावेळी बिग बी अमिताभ बच्चनही मागे राहिले नाहीत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर टीम इंडियाचं कौतुक केलंच, शिवाय दिनेश कार्तिकवरही स्तुतीसुमनं उधळली. मात्र घाईगडबडीत अमिताभ बच्चन यांनी हलकीशी चूक केली. मात्र या महानायकाने आपल्या छोट्याशा चुकीबद्दल जाहीरमाफीही मागितली. 
 
भारताने विजय मिळवताच अमिताभ यांनी ट्विट केलं. “भारत जिंकला!! तिरंगी मालिकेत बांगलादेशविरुद्ध विजय... थरारक सामना...कार्तिकची जबरदस्त फलंदाजी..शेवटच्या 2 षटकात 24 धावांची गरज होती....एका चेंडूवर 5 धावांची गरज होती...कार्तिकने षटकार ठोकला.. अविश्वसनीय!!! अभिनंदन!”
असं अमिताभ बच्चन म्हणाले.

मात्र भारताला शेवटच्या 2 षटकात 34 धावांची गरज होती. हे लक्षात येताच बच्चन यांनी काही वेळात नवं ट्विट केलं.

बच्चन म्हणाले, “2 षटकात 24 नव्हे तर 34 धावांची गरज होती....दिनेश कार्तिकची माफी मागतो... “