रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अनुष्का शर्मा प्रेग्नेंट?... विराटच्या ट्विटवर सस्पेंस

जेव्हा सेलिब्रिटीजमध्ये अफेयर सुरू असत तेव्हा त्यांना विचारण्यात येत की लग्न केव्हा करत आहात? लग्न झाल्याबरोबर मुलांची गोष्ट होऊ लागते.  
 
नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न झाले. त्यांनी काही दिवसच सोबत घालवले आणि आता  अनुष्काच्या प्रेग्नेंट होण्याची बाब समोर येत आहे.  
 
महत्त्वाचे म्हणजे विराट कोहलीने एक ट्विट असे केले होते की ज्यावर लोकांनी विचार करणे सुरू केले आहे. सर्वांनी आपले वेग वेगळा अर्थ काढले.  
 
विराटने ट्विट केले की आता या वेळेस बरेच काही घडत आहे ज्याबद्दल मी तुम्हाला लवकरच सांगीन. आता हे काय होत आहे, जसा प्रश्न विराट ने सर्वांसमोर मांडला आहे.
विराटच्या फँन्सला वाटले की यात काही 'गुड न्यूज' आहे. विराटला विचारण्यात आले की काय अनुष्का प्रेग्नेंट आहे? एकाने ट्विट केले की विराटच्या या ट्विटचे स्क्रीनशॉट घेऊन नऊ महिन्यांसाठी सेव्ह करून ठेवा.  
 
एकाने लिहिले की हे टिपीकल पंजाबी गेस आहे आणि गुड न्यूज येणार आहे. काहींनी ट्विट केले की छोटा विराट येणार आहे.   
 
आता विराटने तर विचार ही केला नसेल की त्याच्या ट्विटचा असा अर्थ काढण्यात येईल. किंवा विराटच्या गोष्टींचा खरा अर्थ लोकांनी काढला आहे. काही दिवसांमध्ये कळून येईल.