शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

गर्भधारणा न होण्याचे 9 कारण

प्रयत्न सुरू असून ही गर्भधारणा होत नसेल तर त्यामागे काही कारणं असू शकतात. यासाठी पुरूष आणि महिला दोघेही जबाबदार असू शकतात. अनेकदा यामागील समस्या स्थायी नसून उपचाराने गर्भधारणा केली जाऊ शकते. बघू या काय कारणं आहे यामागे:
लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे पुरुषांची सक्रियता कमी होते आणि स्पर्म काउंट घटतं. तसेच महिलांच्या ओव्हरीमध्ये चरबी वाढल्याने एग्ज डेवलप होत नाही आणि गर्भधारणेत अडचण येते.
 
वय
पुरुषांमध्ये 35 ते 40 वयानंतर स्पर्म काउंट कमी व्हायला लागतं. तसेच महिलांमध्ये चाळिशीनंतर मेनोपॉज किंवा हॉर्मोनल समस्यांमुळे गर्भधारणेत समस्या उद्भवते.
 
इन्फेक्शन
पुरुषांमध्ये युरीन इन्फेक्शन, टीबी व इतर संक्रमणामुळे स्पर्म काउंट कमी होऊन जातं. तसेच महिलांमध्येही युरीन इन्फेक्शन, यूट्रसमध्ये टीबीमुळे फेलोपियन ट्यूब खराब होऊन जाते.

लाइफस्टाइल
पुरुषांमध्ये सिगारेट, दारू, व्यायाम न करणे, तंबाखू, सलग रात्री उशीरापर्यंत पार्टी करणे यामुळे स्पर्म काउंट कमी होतं. तसेच महिलांमध्ये व्यसन आणि अनहेल्दी लाईफ स्टाइलमुळे गर्भधारणेत समस्या उद्भवतात.
 
ताण आणि डिप्रेशन
तणावामुळे आणि डिप्रेशनमुळे स्पर्म काउंट आणि गुणवत्ता कमजोर होऊन जाते. याने शारीरिक कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. ताणामुळे महिलांमध्ये प्रोलेक्टीन नावाचे हॉर्मोन वाढून जातात ज्यामुळे गर्भधारणेत समस्या येते.
 
हॉर्मोनल समस्या
थायरॉईड, आणि महिलांमध्ये पीसीओएस सारखे हॉर्मोनल प्रॉब्लम्सने पीरियड्सचे संतुलन गडबडतं. याने अंडीच्या निर्माणावर परिणाम होतो आणि गर्भधारणेत समस्या उद्भवते. 

औषधांचा साइड इफेक्ट
औषधांच्या उष्णतेमुळे स्पर्म काउंट कमजोर होतात. तसेच महिलांमध्ये पीरियड्स गडबडल्यामुळे अंड्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडतो.
 
मधुमेह
मधुमेहामुळे स्पर्म काउंट 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. तसेच महिलांमध्ये मधुमेहामुळे अंड्यांच्या निर्मिर्तीवर परिणाम होतो.
 
प्रोफेशन
ताण देणार्‍या, तासोंतास काम करत राहिल्यामुळेही स्पर्म काउंट कमी होतात. किंवा शारीरिक मेहनत अधिक असलेल्या प्रोफेशनमुळेही गर्भधारणेची शक्यता कमी होत जाते.