जीऱ्याचे पाणी गर्भवती महिलेंसाठी फायदेकारक
गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी जिर्याचे पाणी फारच फायदेकारक असते.
कसे प्यावे गर्भवती महिलेने जीऱ्याचे पाणी
जीऱ्याचे पाणी पिण्यासाठी आधी एक लिटर गरम पाण्यात एक चमचा जीरे टाकून ते उकळून घ्यावे. जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा गाळून ते पाणी प्यायला पाहिजे.
जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे
१. ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवते.
जीऱ्यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशिअम ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
२. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ नाही देत.
गर्भवती महिला दोन जीवांची असते. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होण्याचा संभव असतो. जीऱ्याच्या पाण्याने हिमोग्लोबीन वाढते आणि शरीरातील लोहाचे प्रमाणही वाढते.
३. रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
जीऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.