सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

डिलेव्हरीच्या तीन महिन्यापर्यंत आयरन-कॅल्शियम सप्लिमेंटची गरज

स्तनपान करवणारी आईद्वारे घेत असलेला आहार बाळाला मिळत असतो. अशात आईच्या आहाराचा प्रभाव ब्रेस्ट मिल्कच्या गुणवत्तेवर येत असतो. अधिक प्रोटीन आढळणारे आहार जसे साबूत धान्य, डाळी, ड्राय फ्रूट्स, ताज्या भाज्या-फळं, अंडी आणि चिकन सारख्या वस्तू आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी आईला ताज्या फळांचा ज्यूस, नारळ पाणी, लस्सी आणि लिंबाचा रस पिऊ शकतात.
 
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
* आमच्या देशात तूप आईसाठी उत्तम मानलं जातं. याचे फायदे तर आहे परंतू याने नंतर वजन वाढण्याची शक्यता नाकारता येते नाही. डिलेव्हरीनंतर तीन महिन्यापर्यंत आयरन आणि कॅल्शियम सप्लिमेंट घेतले पाहिजे.
* भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, याने दुधाचा प्रवाह वाढेल. ओटमील, बडीशेप, लसूण, आणि गाजर सारख्या वस्तू सेवन केल्याने दुधाचं उत्पाद वाढतं.
* मसालेदार आहार घेणे टाळावे कारण याने पचन शक्ती प्रभावित होते.
* पुरेसं दूध नसेल येत तरी ताण घेऊ नये. ताण घेतल्याचा प्रभाव हार्मोंसवर पडतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.