बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

फणसात असलेले गुणधर्म

सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस अशी फणसाची ओळख होऊ शकते. हे असं फळ किंवा अशी भाजी आहे ज्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आपल्यातील अनेकांना ज्ञात नाहीत. आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊया. 
 
फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए, सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह यांचा फणसात मोठय़ा प्रमाणात समावेश असतो.
 
पिकलेल्या फणसाचा पल्प करून तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो.
 
फणसात मोठय़ा प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.
 
भरपूर प्रमाणात लोह असल्याने अँनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं.

थायरॉईडचा त्रास असणार्याा लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
 
हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांसाठी गुणकारी असते.
फणसात असलेले व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.
 
फणसात असणारे व्हिटॅमिन 'ए' डोळ्यांची शक्ती चांगली ठेवते. तसेच त्वचा उजळण्यासाठीसुद्धा तो फायदेशीर ठरते.