सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

मनुकांचे सेवन आणि त्याचे फायदे

आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आम्हाला रोज 4-5 मनुका खायलाच पाहिजे. मनुकांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात उत्तम औषध मानले जाते. त्याशिवाय देखील मनुकांचे बरेच फायदे असतात. त्यात उपस्थित न्यूट्रिएंट्‌स बर्‍याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर जाणून घेऊ रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहेत. 
 
* मनुका खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव होते. यामुळे त्वचेची रंगत वाढते आणि रंगदेखील निखरण्यास मदत होते.
* मनुकांमध्ये फायबर्स असतात. हे डायजेशन योग्य ठेवण्यास मदत करतात.
* यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. मनुका हार्टअ‍ॅटॅकच्या आजारांमध्ये इफेक्टिव आहे.
* यात आयर्न असते. हे अ‍ॅनिमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यास फायदेशीर ठरतात.
* यात अँटीऑक्सिडेंट्‌स असतात. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.
* यात अँटीबॅक्टीरियल गुण असतात. यामुळे सर्दी-खोकला ठीक होण्यास मदत मिळते.
* यात बीटा कॅरोटीन असतो. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
* यात ऑक्जेलिक ऍसिड असते. यामुळे दात मजबूत होतात. यामुळे गम प्रॉब्लमपासून बचाव होतो.
* यात कॅल्शियमची मात्रा अधिक असते. म्हणून ज्वॉइंट पेनपासून बचाव होतो.
* याचे सेवन केल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होऊन हेयर फॉलची समस्यादेखील दूर होते.
* मनुका खाण्याचे हेल्दी मार्ग - कब्ज दूर करण्यासाठी रात्री पाच मनुका आणि एक लसणाची कळी खायला पाहिजे.
* मनुकांत मध मिसळून खाल्ल्याने देखील फायदा होतो. 
* याला दुधात उकळून त्याचे सेवने केल्यानेदेखील फायदा होतो.
* मनुकांमध्ये शेप आणि ओवा मिसळून खाल्ल्यानेदेखील फायदा होतो.
 
शीतल माने