रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 7 मार्च 2018 (10:43 IST)

विराटने पीएनबी बँकेसोबत असलेले नाते संपवले

पीएनबीचा ब्रँड अॅम्बासिडर असलेला विराट कोहलीने बँकेसोबत असलेलं नातं संपवल आहे. या दरम्यान त्याने टीव्ही आणि प्रिंटच्या सर्व जाहिराती काढून टाकल्या आहेत. तसेच ते कॉन्ट्रक्ट न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विराट हा बँकेचा ब्रँड अॅम्बासिडर आहे. मात्र, नुकत्याच उघड झालेल्या घोटाळ्यामुळे विराटने ही भागीदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या क्रिकेट एजन्सीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली. 

दुसरीकडे विराटने यापुढे बँकेसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्याच्या कराराची मुदत संपेपर्यंत विराट त्यांच्यासोबत असेल. मात्र, सध्याचा करार वाढवण्यात आलेला नाही. या संपूर्ण घटनाक्रमात बँक म्हणून पीएनबीचा कोणताही दोष नाही, असे आम्हाला वाटते. विराट ठरलेल्या कराराची मुदत पूर्ण करणार आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून करार रद्द केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँण्ड एंटरन्टेन्मेंटचे सीईओ बंटी सजदेह यांनी सांगितले.